Pimpri News: ‘एड्‌स’बाधित रुग्णांचे हाल, औषधांसाठी ‘वायसीएमएच’मध्ये थांबावे लागते ताटकळत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील ‘एचआयव्ही’ आणि ‘एड्‌स’बाधित रुग्णांना पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील ‘एआरटी’ केंद्रातून औषधे मिळविण्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे. तीन-तीन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत.

‘एचआयव्ही’ची औषधे पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मिळतात. त्यासाठी ‘एआरटी’ केंद्र रुग्णालयात आहे. पण, मागील सात महिन्यांपासून औषधे मिळण्यासाठी नागरिकांना अडथळे येत आहेत. ताटकळत थांबावे लागत आहे. वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित घोषित केले होते. मार्च महिन्यापासून वायसीएमएचमध्ये केवळ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात होते.

आता शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालय 50 टक्के इतर आजारांच्या रुग्णांसाठी देखील खुले करण्यात आले आहे. असे असतानाही ‘एड्‌स’बाधित रुग्णांना औषधे मिळविण्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे.

‘एचआयव्ही’ आणि ‘एड्‌स’बाधित रुग्णांना नियमित औषधे मिळाणे आवश्यक आहे. औषधे वेळेत न मिळाल्याने रुग्णांचे खूप हाल होत होते. आम्हाला वेळेवर औषधे मिळावीत. त्यासाठी तीन-तीन तास थांबायला लागू नये, अशी मागणी रुग्णांकडून केली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.