Pimpri News : लहुजी शक्ती सेनेच्या वतीने संत तुकाराम नगर येथे ग्रंथालय सुरु, ज्येष्ठ साहित्यिक सोपानराव खुडे यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने संत तुकाराम नगर ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक सोपानराव खुडे यांच्या हस्ते या ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड शहराअध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे होते. यावेळी वीरेंद्र बहल, लेखिका डॉ‌. उज्वला हातागळे, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे अध्यक्ष डी. पी. खंडाळे उपस्थित होते. तसेच अनिल गायकवाड, शिवाजी साळवे, राजूशेठ चव्हाण, आर. जी. गायकवाड, राजरत्न शिलवंत आदी उपस्थित होते.

‘ग्रंथालय हे समाजाच्या प्रगतीचे द्योतक मानले जाते. समाजातील तरुण मोबाईल व टीव्ही मध्ये अडकलेले दिसत आहेत. त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणे हे समाजातील लोकांचे प्रमुख कार्य असेल पाहिजे. समाजाची बौद्धिक भूक भागवण्यासाठी ग्रंथाल्यासारखे दुसरे साधन नाही’, असे ज्येष्ठ साहित्यिक खुडे आपल्या भाषणात म्हणाले.

यावेळी ॲड. रानवडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. याशिवाय डीएसएस अध्यक्ष सोपानराव चव्हाण, पंचशील संघाचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

कार्यक्रमाचे संयोजन लहुजी सेना पिंपरी चिंचवड शहराअध्यक्ष राजूभाऊ आवळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नेटके यांनी केले तर, आभार प्रदर्शन दादाभाऊ आल्हाट यांनी केले.

कार्यक्रमाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर कांबळे, लक्ष्मी लोढम, आशा वरे, ओव्हाळ, सुधीर कांबळे, स्वप्नील नेटके, गणेश वैरागड, स्वप्नील साळवे व उद्योजक संतोष इंगळे, अजय वायदंडे, अनिल आव्हाड यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.