Pimpri News : पिंपरीतून 10 लाखांच्या चपला चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरीत एका घरात ठेवलेल्या 10 लाख 27 हजारांच्या चपला चोरीला गेल्या आहेत. ही चोरी भाऊ आणि भावाच्या पत्नीने केली असल्याची तक्रार एका व्यापा-याने दिली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी सकाळी साडेदहा ते 12 मार्च सकाळी साडेदहाच्या कालावधीत पीडब्ल्यूडी पिंपरी येथे घडली.

रवींद्र यादवराव करांडे (वय 56, रा. पिंपळे सौदागर) यांनी बुधवारी (दि. 11) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विष्णू यादव करांडे (वय 60) आणि त्यांची पत्नी (वय 55, दोघे रा. पीडब्ल्यूडी पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडब्ल्यूडी येथील मिळकतीत हॉल व बेडरूममध्ये फिर्यादी यांनी 10 लाख 27 हजार 742 रुपयांच्या महाराजा व आग्रा कंपनीच्या तीन हजार 402 चपला व बुटांचा माल ठेवला होता. फिर्यादी यांचा भाऊ विष्णू आणि त्यांच्या पत्नी यांनी या चपला व बुटांचे जोड चोरी केले असे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

वाकडमधून रिक्षा चोरीला

ज्योतिबानगर वाकड येथून 70 हजार रुपये किमतीचा एक तीनचाकी रिक्षा (एम एच 14 / सी यु 2031) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 8 मे रोजी रात्री साडेअकरा ते ९ मे सकाळी सात वाजताच्या कालावधीत घडली. याप्रकरणी राजेंद्र लक्ष्मण जाधव (वय 30, रा. ज्योतिबानगर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.