Pimpri News: शहरात आज 103 नवीन रुग्णांची नोंद, 98 जणांना डिस्चार्ज, 3 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 103 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 95 हजार 436 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 98 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील दोन आणि पालिका हद्दीबाहेरील एक अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात चिखलीतील 58 वर्षीय पुरुष, 73 वर्षीय महिला आणि पालिका हद्दीबाहेरील दौड येथील 72 वर्षीय महिला रुग्णाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 95 हजार 436 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 91 हजार 954 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1737 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 714 अशा 2451 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 748 सक्रीय रुग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरु आहेत. तर, 599 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.