Pimpri Corona Update : शहरात आज 111 नवीन रुग्णांची नोंद, 121 जणांना डिस्चार्ज, 3 मृत्यू

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहराच्या  विविध भागातील 111 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 95 हजार 961 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या  121 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील तीन जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात बिजलीनगर येथील 61 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 65 वर्षीय पुरुष आणि दिघीतील 48 वर्षीय पुरुष रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 95 हजार 961 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 92 हजार 512 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1745 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रुग्णालयात उपचार घेणार्‍या 717 अशा 2462 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 747  सक्रीय रुग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 839 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.