Pimpri News: शहरात आज 123 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज, 115 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 115 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 123 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 346 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 64 हजार 841 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 947 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 216 रुग्ण गृहविलगीकरणात असून 731 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 45 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 421 आहेत. आज दिवसभरात 3 हजार 852 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 11 लाख 17 हजार 125 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.