Pimpri news: ‘पीसीएमटीचे’ 124 कर्मचारी अखेर महापालिका आस्थापनेवर कायम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहन (पीसीएमटी) खात्यातील तात्पुरत्या स्वरूपात वर्ग केलेल्या 124 कर्मचाऱ्यांना पिंपरी -चिंचवड महापालिका आस्थापनेवर कायमस्वरूपी वर्ग करून घेण्यात आहे आहे.

पूर्वीच्या पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहन (पीसीएमटी) खात्यात अतिरिक्त ठरणारे चतुर्थ श्रेणीतील 221 कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या विविध विभागांमध्ये पीसीएमटीकडून वर्ग करण्यात आले होते. हे कर्मचारी 18 जून 2001 पासून ते आजतागायत गेल्या 22 वर्षांपासून महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करीत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना मासिक पगारापोटी लागणारी रक्कम ही महापालिकेकडून देण्यात येत आहे. पीसीएमटीतून वर्ग केलेल्या 221 कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले. तर, काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले.

सध्या महापालिकेकहे 124 कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी आपल्या आस्थापनेवर कायमस्वरूपी वर्ग करून घेण्याबावत कार्यवाही करावी, असे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) सह व्यवस्थापकीय संचालक यांनी महापालिकेला कळविले. तसेच, महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष यांनाही हा प्रस्ताव पाठविला. त्यास नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.