Pimpri News: भाजपच्या 13 नगरसेवकांना एकाच वर्षात दोन पदे; सहा प्रभागांवर कृपादृष्टी !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या तब्बल 13 नगरसेवकांना एकाच वर्षात दोन पदे मिळाली आहेत. पक्षश्रेष्ठींनी त्यांना दोनवेळा पदे बहाल केली. तर, सहा प्रभागातील भाजपच्या सर्वच नगरसेवकांना पदे मिळाली आहेत. यावरुन सहा प्रभागांवर भाजपचे विशेष प्रेम असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे तब्बल 27 नगरसेवकांना अद्याप एकही पद मिळालेले नाही.

दोन पदे मिळालेले भाग्यवान नगरसेवक !

केशव घोळवे- उपमहापौर, प्रभाग समिती अध्यक्षपद, सचिन चिंचवडे -उपमहापौरपद, प्रभाग समिती, तुषार हिंगे -उपमहापौर, क्रीडा समिती सभापती, मनीषा पवार सलग दोनवेळा शिक्षण समिती सभापतीपद, सोनाली गव्हाणे- शिक्षण आणि शहर सुधारणा, स्वीनल म्हेत्रे -महिला व बालकल्याण आणि विधी समिती, राजेंद्र लांडगे -शहर सुधारणा, प्रभाग अध्यक्षपद, करुणा चिंचवडे, भीमाबाई फुगे, शर्मिला बाबर, बाबा त्रिभुवन दोनवेळा प्रभाग समितीचे अध्यक्षपद, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे यांनी सलग तीनवेळा प्रभाग अध्यक्षपद सांभाळले आहे. एकाच वर्षात त्यांना दोन पदे मिळाली आहेत.

या प्रभागांवर भाजपची कृपादृष्टी !

प्रभाग क्रमांक सातमधून निवडून आलेले संतोष लोंढे यांना स्थायी समितीचे अध्यक्ष पद , सोनाली गव्हाणे यांना शिक्षण, शहर सुधारणा समिती आणि भीमाबाई फुगे यांना दोनवेळा प्रभाग अध्यक्षपद मिळाले. प्रभाग आठमधून निवडून आलेल्या सीमा सावळे, विलास मडिगेरी यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद, तर नम्रता लोंढे यांना प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळाले.

प्रभाग दहामधून निवडून आलेले केशव घोळवे यांना उपमहापौर, प्रभाग अध्यक्ष, तुषार हिंगे यांना उपमहापौर, क्रीडा समिती सभापतीपद आणि अनुराधा गोरखे यांना प्रभाग अध्यक्षपद मिळाले आहे. क्रमांक 11 पूर्णानगर, घरकूलमधून निवडून आलेले एकनाथ पवार यांना सभागृह नेतेपद, अश्विनी बोबडे विधी समिती, संजय नेवाळे क्रीडा समिती, योगिता नागरगोजे यांचा प्रभागअध्यक्षपद मिळाले आहे.

चिंचवडमधील प्रभाग 17 वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगरमध्ये चारही नगरसेवक भाजपचे निवडून आले. माधुरी कुलकर्णी यांना विधी समितीचे सभापतीपद, करुणा चिंचवडे यांना दोनवेळा प्रभाग समितीचे अध्यक्षपद दिले. राष्ट्रवादीचे दिग्गज भाऊसाहेब भोईर यांचा पराभव केलेल्या सचिन चिंचवडे यांना सव्वा वर्ष उपमहापौर, प्रभाग अध्यक्षपद दिले.

ढाके यांना सभागृह नेतेपद दिले. प्रभाग क्रमांक 29 पिंपळेगुरव, वैदूवस्तीमधून निवडून आलेल्या उषा मुंढे यांना जैव विविधता समिती, चंदा लोखंडे यांना महिला व बालकल्याण समिती, सागर आंगोळकर, शशिकांत कदम यांना प्रभाग अध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे चारही नगरसेवकांना महत्वाची पदे मिळाली आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.