Pimpri News : कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 13 जणांना ताब्यात घेत 8  शस्त्रे जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने केलेल्या कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी दरम्यान 13 जणांना ताब्यात घेण्यात (Pimpri News)आले. त्यांच्याकडून आठ घातक शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या गुंडा विरोधी पथकाने चिखली-मोई रोडवर चाकण एमआयडीसी मध्ये कामावर जाणाऱ्या कामगारांना प्रवासी म्हणून रिक्षात बसवून निर्जन ठिकाणी नेऊन त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणारी टोळी पकडली. सिद्धार्थ कल्याण सोनवणे (वय 18), दयानंद बालाजी घाडगे (रा. 18, दोघे रा.  चिंचवड) आणि दोन अल्पवयीन साथीदार यांना यांना ताब्यात घेऊन दोन लाख 31 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल त्यात रिक्षा, दोन सुरे, दोन लॅपटॉप, चार्जर, माऊस, दोन मोबाईल, सॅक बॅग, मनी पर्स, क्रेडिट व डेबिट कार्ड जप्त करण्यात आले. या आरोपींची यापूर्वी रात्रीच्या वेळी लोकांना लुटले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Alandi News : राष्ट्रीय चालक एकता महामंचाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले

तसेच अली तैयब सैयद (वय 19, रा. आकुर्डी गावठाण) याच्याकडून एक तलवार, अंकित अनिल मारसनळी (वय 19, रा. आकुर्डी) यांच्याकडून एक रॅम्बो तलवार, शिवम सुनील दुबे (वय 20, रा. आकुर्डी) याच्याकडून एक कोयता, साईनाथ विष्णू बुरसे (वय 20, रा. दिघी) याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट दोनने शुभम उर्फ चिम्या शिवदास पवार (वय 20, रा. निगडी), दीपक मारुती राजगुरू (वय 25, रा. निगडी) यांना ताब्यात घेऊन सहा घरफोड्यातील 1 लाख 2 हजार 999 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सुरेश उर्फ सुरज हरिद्वार गुप्ता (वय 31, रा. भोसरी) याला अटक केली. या कारवाई मुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील सहा गुन्हे उघडकीस आले. गुन्हे शाखा युनिट 4 ने अक्षय दशरथ शिंदे (वय 22, रा. पिंपळे गुरव) याच्याकडून कोयता, दीपक शशिकांत पवार (वय 23, रा. निगडी) याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.