.

Pimpri News: ‘एमपीसी न्यूज’चा 13 वा वर्धापनदिन साधेपणाने, मात्र उत्साहात साजरा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले सिटी न्यूज पोर्टल असलेले ‘एमपीसी न्यूज डॉट इन’ (mpcnews.in) ने आज 22 जुलै रोजी 13 वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करुन 14 व्या वर्षात पदार्पण केले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने पण मोठ्या उत्साहात पिंपरी कार्यालयात 13 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

वर्धापनदिनानिमित्त पिंपरीतील कार्यालयात संपादक विवेक इनामदार, कार्यकारी संपादक हृषीकेश तपशाळकर आणि सहयोगी संपादक अनिल कातळे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. चीफ रिपोर्टर गणेश यादव, बिझनेस डेव्हल्पमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे तसेच समीर पाटील, प्रवीण टाव्हरे हे सहकारी यावेळी उपस्थित होते.

‘एमपीसी न्यूज डॉट इन’ 22 जुलै 2008 पासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मावळकरांच्या सेवेत आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वांत पहिले आणि अग्रगण्य सिटी न्यूज पोर्टल आहे. शहरातील ताज्या घडामोडींचे सर्वांत फास्ट आणि विश्वासार्ह अपडेट नागरिकांना देण्याचे काम ‘एमपीसी न्यूज’ करत आहे. विश्वासार्ह बातम्यांच्या माध्यमातून ‘एमपीसी न्यूज’ने वाचकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. नागरिकांना कधीही, कुठेही एकदम अपडेट ठेवण्याचे कर्तव्य ‘एमपीसी न्यूज’ गेली 13 वर्ष पार पाडत आहे. सर्वात फास्ट आणि विश्वासार्ह अपडेट देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

वाचक, हितचिंतक, जाहिरातदारांमुळेच आम्ही 13 वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करु शकलो. सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत, या शब्दांत संपादक विवेक इनामदार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वाचक स्नेह मेळावा आयोजित न करता, साधेपणाने कार्यालयातच केक कापून 13 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतीक विविध क्षेत्रातील नागरिकांनी फोनवरुन शुभेच्छा दिल्या. व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक या सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn