Pimpri corona Update : शहरात 144 नवीन रुग्ण, 165 जण कोरोनामुक्त, 10 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 127 आणि पालिका हद्दीबाहेरील 17 अशा 144 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 87 हजार 51 झाली असून, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 165 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 8 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 2 अशा 10 रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यात चिखली, आकुर्डी, पिंपळेगुरव, निगडी, चिंचवड, मोशी, कासारवाडी, लोणावळा, वाघोली येथील रुग्णांचा समावेश आहे.

एमपीसी न्यूज – अंतरंग दसरा विशेषांक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरात आजपर्यंत 87 हजार 51 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 83 हजार 374 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1519 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 627 अशा 2146 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1049 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 993 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.