Pimpri News : दिव्यांगांच्या मोफत बस पासला 15 दिवसांची मुदतवाढ

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील दिव्यांग व्यक्तींना पीएमपीएल बसमधून मोफत प्रवासासाठी पास दिले आहेत. या पासची 31 मार्च रोजी समाप्त झाली आहे. दरम्यान ‘पीएमपी’च्या वतीने दिव्यांगांच्या बस पाससाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्याचे पास 16  एप्रिलपर्यंत नूतनीकरण करण्याचे आवाहन ‘पीएमपी’च्यावतीने करण्यात आले आहे.

‘पीएमपी’च्या वाहतूक व्यवस्थापकांनी एका निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. दिव्यांग मोफत बस पासची मुदत काल, 31  मार्चला संपली. त्यामुळे आज एक एप्रिल असल्यामुळे मोफत पास धारक दिव्यांग प्रवासी व वाहक यांच्यामध्ये बसमध्ये तिकीट घेण्यासाठी वाद विवाद झाले.

हा सर्व प्रकार प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले व उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्वरित पीएमपीएल कार्यालयात धाव घेतली. त्याठिकाणी महापालिकेचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांना बोलवून घेत दिव्यांगांबाबत घडलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका नागरवस्ती विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी ताबडतोब पंधरा दिवसांची मुदत वाढवून एक एप्रिल ते पंधरा एप्रिल पर्यंत जुनेच पास ग्राह्य धरण्यात यावेत असे पत्र पीएमपीएल प्रशासनाला दिले.

त्यानुसार पीएमपीएलकडून नवीन परिपत्रक काढून दिव्यांग पासला पंधरा दिवसांची मुदतवाढ देत असल्याबाबत पीएमपीच्या सर्व वाहकांना सूचना देण्यात आल्या.

याबाबत राजेंद्र वाकचौरे म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिका पीएमपीएमएल प्रशासनाला दिव्यांग मोफत बस पाससाठी वर्षाचे पैसे देत असते. असे असताना सुद्धा पीएमपी वाहक दिव्यांग बांधवांकडून तिकिटाचे पैसे घेतात. याला जबाबदार कोण ?. ज्या दिव्यांग बांधवांकडून तिकीट घेतले, त्यांचे पैसे परत कोण देणार?.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.