Pimpri News : शहरातील विविध भागात 15 इम्युनिटी क्लिनिक सुरु

रोग प्रतिकार शक्ती नैसर्गिक पद्धतीने वाढविण्यासाठी मिळणार उपचार आणि मार्गदर्शन

एमपीसीन्यूज : COVID 19 या आजारावर अजूनही 100% प्रभावी औषधे किंवा लस उपलब्ध नाही. आपली प्रतिकार शक्ती चांगली असल्यास आजार न होणे किंवा झाल्यास लवकर बरा होण्यास मदत होत असल्याचे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. याच धर्तीवर रोग प्रतिकार शक्ती नैसर्गिक पद्धतीने वाढविण्याच्या दृष्टीने ही आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिकची संकल्पना समोर आली. NIMAचे सदस्य असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टरांनी विविध भागात एकूण १५ रजिस्टर इम्युनिटी क्लिनिक सुरु केले आहेत.

कोविड 19 आयुष टास्क फोर्स, महाराष्ट्र शासन आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा संलग्नित एन.ए.आय.सी. म्हणजेच NIMA आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक्स राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते गुरुवार (दि. 20) पासून संपूर्ण राज्यभर सुरु करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये साधारणपणे चारशे क्लिनिक सुरू करण्यात आली.

NIMAचे सदस्य असलेल्या डॉक्टरांच्यावतीने आपापल्या क्लिनिकमध्ये ही इम्युनिटी क्लिनिक सुरु करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ही क्लिनिक जिल्हा आणि तालुका ठिकाणी मोठ्या संख्येने सुरु करण्यात येतील.

या क्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रश्नावलीद्वारा संपूर्ण माहिती घेऊन प्रकृती परीक्षण आणि इम्युनिटी स्कोअर निश्चित करण्यात येईल आणि त्या- त्या व्यक्तींनुसार त्यांना आवश्यक आयुर्वेदिक औषधी देण्यात येतील.

तसेच दैनंदिन जीवन पद्धतीतील बदल, व्यायाम, योगाभ्यास याचे व्यक्तिपरत्वे योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. प्रत्येक व्यक्तीने या क्लिनिकमध्ये मार्गदर्शन केल्याप्रमाणे 2 महिन्यात किमान 4 वेळा येणे आवश्यक राहिल. त्यासाठी सुरुवातीला एकदा माफक नोंदणीशुल्क आकारले जाईल.

त्या नंतर ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार फक्त औषधीचे माफक शुल्क (ना नफा ना तोटा तत्वावर ) आणि आवश्यक त्या औषधी लिहून दिल्यास त्या बाहेरून खरेदी कराव्या लागतील. हे सर्व एका विशिष्ट प्रोटोकॉल नुसार राहील. कुठलीही फसवणूक होणार नाही याची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शाखेने आज पहिल्या टप्प्यामध्ये शहरातील विविध भागांमध्ये 15 रजिस्टर इम्युनिटी क्लिनिक सुरु केले आहेत. या सर्व क्लिनिकचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन पत्रकार हनुमंत पाटील  यांच्या हस्ते निर्विकार हॉस्पिटल, भोसरी येथे करण्यात आले.

निमा वुमन्स फोरमच्या उपाध्यक्षा डॉ. जबिन पठाण, डॉ. अर्चना शिंदे, सदस्या डॉ. प्रेरणा बेरी, डॉ. सारिका लोंढे, डॉ. कोमल खंडेलवाल उपस्थित होत्या.

निमा पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ. सत्यजित पाटील, सचिव डॉ. अभय तांबिले, खजिनदार सुनील पाटील, डॉ. नीलेश लोंढे, निमा स्टेट व सेंट्रलचे डॉ. दत्तात्रय कोकाटे, डॉ. नंदकुमार माळशिरसकर, डॉ. सुहास जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच निमा स्टेटचे डॉ. तुषार सूर्यवंशी यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी चिंचवड शहरातील इम्युनिटी क्लिनिक आंबी डॉक्टर यांचे संपर्क क्रमांक

निगडी – डॉ. प्रेरणा कालेकर (9881242693), डॉ. चिंतामणी शिंदगीकर (9226144164).

भोसरी – डॉ. सारिका लोंढे (7776008686).

चिंचवड स्टेशन व चिंचवड गाव – डॉ. संयोगिता चव्हाण (9225627076), डॉ. प्रज्ञा मोहिते ( 9112119112).

च-होली, मोशी- डॉ. स्वाती दगडे (9970408011).

चिखली – डॉ. काेमल खंडेलवाल (8975583183), डॉ. अभय तांबिले ( 9422338513).

सांगवी- डॉ. दत्तात्रय कोकाटे (9145101010), डॉ. वैशाली लोढा ( 9028626191).

हिंजवडी – डॉ. प्रज्ञा खोसे (9822055737).

पिंपरी- डॉ. सुहास जाधव (7028183600), डॉ. मंगेश वाघ (8888099988), डॉ. मृदुला कुलकर्णी (9226490121).

डॉ. डी. जी. दींपकर (9822279321).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.