Pimpri corona Update : शहरात 183 नवीन रुग्ण, 184 जण कोरोनामुक्त, 8 मृत्यू

20 लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 172 आणि पालिका हद्दीबाहेरील 11 अशा 183 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 86 हजार 636 झाली. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 184 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 6 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 2 अशा 8 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिखलीतील 79 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 37 वर्षीय युवक, पिंपरीतील 48 वर्षीय पुरुष, मोशीतील 58 वर्षीय पुरुष, ताथवडेतील 68 वर्षीय आणि भोसरीतील 71 वर्षीय अशा दोन महिलांचा मृत्यू झाला.

तर, पालिका हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी हद्दीमधील रुग्णालयात खोदड येथील 73 वर्षीय चर्तुशृंगी मधील 52 वर्षीय अशा दोन पुरुषांचा मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 86 हजार 636 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 82 हजार 899 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1508 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 622 अशा 2130 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1231 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1755 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

दरम्यान, माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिम (दुसरा टप्पा) अंतर्गत आज अखेर 1314 पथकांव्दारे 20 लाख 18 हजार 887 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 4911 व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली. त्यापैकी 164 व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.