Pimpri News: 2 लाख 63 हजार जणांनी पहिला; 24 हजार जणांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर, वय वर्ष 60, त्यापुढील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपुढील अशा 2 लाख 63 हजार 442 जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर, त्यातील 24 हजार 284 जणांनी दुसराही डोस घेतला आहे.

लस टोचून घेणा-यांमध्ये 45 वर्षांपुढील नागरिक आणि ज्येष्ठांचे प्रमाण जास्त आहे. पहिला आणि दुसरा डोस असे 2 लाख 87 हजार 726 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. दरम्यान, दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. शासकीय 71 आणि खासगी 29 अशा 100 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. पहिल्या आणि दुस-या टप्प्यात वैद्यकिय क्षेत्रातील लोकांना, फ्रंटर वर्कर यांना लस देण्यात आली.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मार्च पासून सुरु झाला आहे. या टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस टोचण्यात आली. 1 एप्रिल पासून 45 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण सुरू झाले आहे.

कोरोना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसार डोस दिला जातो. आरोग्य सेवकांमध्ये 23 हजार 236 जणांनी पहिला तर 11 हजार 209 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रंटलाईन वर्करमध्ये 22 हजार 766 जणांनी पहिला तर 6343 जणांनी दुसरा डोस घेतला. ज्येष्ठ नागरिकांमध्ये 99 हजार 334 जणांनी पहिला डोस घेतला आहे. त्यातील 4 हजार 950 जणांनी दुसराही डोस घेतला आहे.

45 वर्षांपुढील 1 लाख 18 हजार 106 जणांनी पहिला डोस घेतला असून त्यातील 1 हजार 782 जणांनी दुसराही डोस घेतला आहे. असे एकूण 2 लाख 63 हजार 442 जणांनी पहिला तर 24 हजार 284 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसराही डोस घेतला आहे. एकूण 2 लाख 87 हजार 726 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

सर्वाधिक लसीकरण नवीन जिजामाता रुग्णालयात झाले असून 13 हजार 677 जणांना लस टोचविण्यात आली आहे. 5 एप्रिल रोजी 15 हजार 637, 6 एप्रिल 10 हजार 11, 7 एप्रिल 12 हजार 495, 8 एप्रिल 9 हजार 579, 9 एप्रिल 0, 10 एप्रिल 14 हजार 513, 11 एप्रिल 11 हजार 428, 12 एप्रिल 10 हजार 495, 13 एप्रिल 5 हजार 79, 14 एप्रिल 6 हजार 261, 15 एप्रिल 9 हजार 81 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.