Pimpri corona Update: शहरात आज 2 हजार 221 नवीन रुग्णांची नोंद; 34 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 188 आणि महापालिका हद्दीबाहेरील 33 अशा 2 हजार 221 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. तर, तब्बल 34 जणांचा मृत्यू झाला आहे.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2439 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 21 आणि महापालिका हद्दीबाहेरील 13 अशा 34 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात 17 पुरुष आणि 17 महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 69 हजार 964 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 42 हजार 464 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2198 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 898 अशा 3096 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 5557 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 2514 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 2 लाख 56 हजार 810 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.