Pimpri News : स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेत 26 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 10 मधील महात्मा ज्योतिराव फुले पुतळ्या शेजारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे व स्मारकाचे सुशोभिकरण आणि स्थापत्य विषयक कामे करण्याकामी येणाऱ्या 9 कोटी 66 लाख 38 हजार इतक्या खर्चासह एकूण 26 कोटी 8 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आज झालेल्या ऑनलाईन स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकास कामांसाठी मंजूरी देण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात बुधवारी (दि. 22) स्थायी समितीची ऑनलाईन पद्धतीने सभा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. नितीन लांडगे होते.

प्रभाग क्रमांक 10 मधिल महात्मा ज्योतिराव फुले पुतळ्या शेजारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे व म्युरल बसविण्याकामी येणाऱ्या 4 कोटी 87 लाख 96 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

शिक्षण विभागाच्या 105 प्राथमिक शाळा, माध्यमिक विभागाचे 18 माध्यमिक विद्यालय आणि महानगरपालिकेचे 2 औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) येथे मनुष्यबळाद्वारे वर्ग खोल्या साफसफाई करण्याकामी 186 कामगार, यांत्रिकी पद्धतीने शौचालय व मुताऱ्या साफसफाई करण्यासाठी 46 कामगार व क्षेत्रीय कार्यालयानुसार 9 सुपरवायजर पुरविणे या कामासाठी 2 वर्षे कालावधीकरिता येणाऱ्या 1 कोटी 9 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 25 पुनावळे व प्रभागातील इतर रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याकामी येणाऱ्या  48 लाख 16 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी येणाऱ्या 1 कोटी 4 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 15 भागातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकामी येणाऱ्या 51 लाख 28 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 14 मध्ये आकुर्डी व परिसरातील स्टॉर्म वॉटर, फुटपाथ विषयक कामे करण्याकामी येणाऱ्या 36 लाख 92 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 20 एम आय डी सी तील जनरल ब्लॉक मधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकामी येणाऱ्या 53 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

कोरोना-19 च्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ह.भ.प.कै.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल आकुर्डी रुग्णालयातील 15 बेडसचा पॅकेजच्या दराने 14 आयसीयु बेडसचे एक पॅकेज करीता इओआय अटी शर्ती नुसार एकुण 14 आयसीयु बेडसचे काम चालु करण्याकामी येणाऱ्या 62 लाख 72 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.