Pimpri news: रस्ते विकासासह 31 कोटीच्या कामांना स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांचा  खर्च, अवलोकन आणि ऐनवेळच्या विषयासह झालेल्या आणि येणा-या सुमारे 30 कोटी 93 लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

प्रभाग क्र.29 पिंपळे गुरव येथील गंगोत्रीनगर, विजयनगर, भालेकरनगर, साईनाथनगर, तुळजाभवानी नगर, सुवर्ण पार्क गुरुदत्तनगर, पंचरत्ननगर आणि इतर उर्वरित परिसरातील रस्ते अद्ययावत पध्दतीने विकसीत करण्याकामी  4 कोटी 95 लाख 54 हजार रुपये खर्च होणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

च-होली येथील मैलाशुध्दीकरण केंद्राची देखभाल आणि दुरुस्ती करण्याकामी 1 कोटी 38 लाख 75 हजार रुपये, प्रभाग क्र.3मोशी –  च-होली मध्ये अंतर्गत कॉलनी रस्ते आणि मुख्य  डांबरी रस्त्यांची दुरुस्तीची कामे करण्याकामी 31 लाख 27 हजार रुपये, प्रभाग क्र. 3 मोशी च-होली येथील विविध ठिकाणच्या चरांची आणि डांबरी रस्त्यांची दुरुस्ती करण्याकामी 31 लाख रुपये  खर्च होतील.

प्रभाग क्र. 24 मधील कॉंक्रीट रस्त्यावर विद्युत विषयक कामे करण्यासाठी या 44 लाख 64 हजार रुपये, काळेवाडी फाटा ते देहु-आळंदी बी.आर.टी रस्त्यावरील बस स्थानकांसाठी वाहतुक नियंत्रण दिवे बसविणे आणि मुख्य चौकातील यंत्रणेचे सिंक्रोनायजिंग करण्याकामी 30 लाख 35 हजार रुपये, प्रभाग क्र. 23 मधील कॉंक्रीट रस्त्यावर विद्युत विषयक कामे करण्याकामी 44 लाख 64 हजार रुपये खर्च केले जाणार आहे. या खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.