Pimpri News : ‘सेवा सप्ताह अभियान’ अंतर्गत 321 दात्यांचे रक्तदान

शहरातील मोशी, प्राधिकरण, दिघी, चिखली, त्रिवेणीनगर, आकुर्डी, चिंचवड येथील परिसरात हे अभियान राबवण्यात आले.

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर सेवा सप्ताह अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतिने आयोजित शिबिरात 321 जणांनी रक्तदान केले.

शहरातील मोशी, प्राधिकरण, दिघी, चिखली, त्रिवेणीनगर, आकुर्डी, चिंचवड येथील परिसरात हे अभियान राबवण्यात आले. कोरोनाच्या या संकट काळात देखील नागरिकांनी शिबिरास उदंड प्रतिसाद दिला. या अभियानात संपूर्ण शहरात 321 रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले.

भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमो शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्या नेतृत्वाखाली शहरात ठिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

स्थानिक भाजपा नगरसेवक, मोरया ब्लड बँकेच्या सहकार्याने भाजयुमोचे सचिन बंदी, मिहीर झा, उदय गायकवाड, शिरीष जेधे, सागर घोरपडे, पंकज शर्मा, ऋतिक चव्हाण, भूषण माळी, हेमंत देवकुळे, पूजा आल्हाट, संदीप पाटील, ऋषिकेश भालेकर यांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.