Pimpri News : संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 383 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज – काल (दि.26 मार्च) सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज (Pimpri News) यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच काळेवाडी पिंपरी यांच्या वतीने संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन काल(दि.26) संत निरंकारी सत्संग भवन, विजयनगर, काळेवाडी येथे करण्यात आले होते. ज्यामध्ये 383 भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले, यामध्ये यशवंतराव चव्हाण रक्तपेढी यांनी 163 युनिट, ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी 100 युनिट, संत निरंकारी रक्तपेढी यांनी 120 युनिट रक्त संकलन केले.

 

 

 

 

 या शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. दरम्यान या रक्तदान शिबिराला अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

 

 संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर 1986 मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी केले होते आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वा रे मागील 37 वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत 7478 रक्तदान शिबीर संपन्न झाली असून 12,33,178 युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे.

 

Chinchwad News : पारंपारिक लावणी जपली जाईल – सुधीर मुनगंटीवार

 

 

बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.

 

 संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.

 

 रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादलचे क्षेत्रीय संचालक किशनलाल अडवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, मिशन चे सेवादार,अनुयायी यांनी योगदान दिले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार (Pimpri News) गिरधारीलाल मतनानी (पिंपरी सेक्टर प्रमुख) यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.