Pimpri news: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत 47 रुग्ण सापडले; सव्वादोन लाख नागरिकांचे सर्वेक्षण

कोविड 19 नियंत्रणासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी व कोविड मुक्त महाराष्ट्र मोहिमे अंतर्गत "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेचा पालिका क्षेत्रात 18 सप्टेंबरपासून प्रारंभ झाला.

एमपीसी न्यूज – ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील 47 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. मागील पाच दिवसांत 709 टीमने शहरातील 72 हजार 379 घरांना भेट देत 2 लाख 25 हजार 823 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. या मोहिमेत मधुमेहाचे 1322, उचरक्तदाब 1541 आणि इतर आजार असलेले 60 रुग्ण सापडले आहेत. कोमोर्बिड आजार असलेल्या या नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. तर, सारी, आयएलआयचे 110 रुग्ण सापडले आहेत. त्यांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे.

कोविड 19 नियंत्रणासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी व कोविड मुक्त महाराष्ट्र मोहिमे अंतर्गत “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेचा पालिका क्षेत्रात 18 सप्टेंबरपासून प्रारंभ झाला.

पिंपरी-चिंचवड महापालिका दोन टप्प्यात ही मोहीम राबविणार आहे. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2020 दरम्यान पहिला तर दुसरा टप्पा 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 दरम्यान असणार आहे.

या मोहिमेअंतर्गत शहरातील 24 लाख 76 हजार 483 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 2166 स्वयंसेवकांची त्यासाठी मदत घेतली जाणार आहे. या माध्यमातून सहा ते सात लाख घरांपर्यंत पोहचणार आहे.

शहरात माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम सुरू आहे. त्यासाठी 709 टीम कार्यरत आहेत. शहरातील नागरिकांच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. कोमोर्बिड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीशः भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे.

कुटुंबातील प्रत्येक सदस्याना तापमान SpO2 तपासणे, Comorbid Condition,ताप खोकला, दम लागणे आदी आजारांबाबतची माहिती घेवून त्यांना कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींना जवळच्या फिवर क्लिनिक मध्ये संदर्भित करण्यात येत आहे.

मागील पाच दिवसांत या मोहिमेअंतर्गत शहरातील 72 हजार 379 घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. 2 लाख 25 हजार 823 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. मधुमेहाचे 1322, उचरक्तदाब 1541 आणि इतर आजार असलेले 60 रुग्ण सापडले आहेत.

सारी, आयएलआयचे 110 रुग्ण तर, 47 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.