_MPC_DIR_MPU_III

Pimpri News : रस्त्यावरील जप्त 475 बेवारस वाहनांचा होणार लिलाव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक रस्ते, मोकळ्या जागेत धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या पथकाने ही वाहने जप्त केली आहेत. मोशी कचरा डेपोजवळील खाण परिसरात जप्त करण्यात आलेल्या तब्बल 475 वाहनांचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर, पदपथावर बेवारस वाहने उभी दिसतात. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे व अस्वच्छता देखील पसरत आहे. स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी ही वाहने हटविण्याची मागणी केली होती. याबबाबत महापालिका, वाहतूक विभाग आणि आरटीओ यांच्या सहकार्याने समिती गठित करण्यात आली. त्यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील धूळ खात पडलेली वाहने जप्त करण्यात आली. त्यानुसार दुचाकी, तीन चाकी रिक्षा, ऑटो, मोटार, ट्रक, मिनी बस अशी तब्बल 475 वाहने जप्त केली आहेत.

मोशी कचरा डेपोजवळील खाण परिसरात हि जप्त करण्यात आलेली वाहने ठेवण्यात आली आहेत. आरटीओतील नोंदीनुसार संबंधित वाहनमालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जप्त केलेल्या या वाहनांचा लिलाव केला जाणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.