Pimpri News : शालेय फी 50 टक्के माफ करा : सचिन साठे

एमपीसी न्यूज – पालकांच्या प्रचंड दबावानंतर महापालिका आयुक्तांनी खासगी शिक्षण संस्थांनी 15 टक्के फी कमी घ्यावी, असा आदेश काढला. हे पुरेसे नसून सर्व विद्यार्थ्यांची 50 टक्के फी कमी घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकाव्दारे केली आहे.

कोरोना महामारी, लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून लाखो नागरीक बेरोजगार झाले आहेत. बहुतांशी पालक आपल्या पाल्यांची शैक्षणिक फी देखिल भरु शकत नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन पालक व विद्यार्थ्यांकडे फी भरण्याबाबत तगादा लावणा-या शिक्षण संस्थांवर कडक कायदेशीर कारवाई प्रशासनाने करावी. सद्यस्थितीत ऑनलाईन वर्ग सुरु झाले आहेत.

परंतू, फी बाकी असणा-या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून ऑनलाईन वर्गाची लिंक पाठवली जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशाही शिक्षण संस्थांवर देखील कायदेशीर कारवाई महापालिका आयुक्तांनी करावी, अशी मागणी साठे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.