Pimpri news: शहरात रविवारी ‘रिव्हर सायक्लोथॉन’, 5 हजार सायकलस्वार होणार सहभागी

0
_MPC_DIR_MPU_IV

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका, सायकल मित्र, अविरत श्रमदान आणि महेशदादा स्पोर्टस फाउंडेशन यांच्या वतीने येत्या (रविवारी) ‘रिव्हर सायक्लोथॉन-2021’ चे आयोजन करण्यात आले आहे.

इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत यावर्षी होणारी ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ पिंपरी-चिंचवडमधील कोरोना योद्धयांना समर्पित करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, महापालिकेचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता सतिश इंगळे, उपअभियंता विजय भोजने, सचिन लांडगे आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे यांच्या पुढाकाराने राज्यातील सर्वात मोठी सायकल रॅली पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिवर्षी आयोजित केली जाते. या रॅलीमध्ये सुमारे 5 हजार सायकलस्वार सहभागी होत असतात. यावर्षी कोरोना आणि लॉकडाउनमुळे रॅलीचे नियोजन पुढे ढकलण्यात आले होते.

दरम्यान, प्रशासनाच्या सूचना आणि नियमांचे पालन करीत येत्या 17 जानेवारीला भोसरीतील गावजत्रा मैदानावर (कै. अंकुशराव लांडगे सभागृह शेजारी) सकाळी 6 वाजता रॅलीला सुरूवात होईल.

10 किमी आणि 25 किमी अशा दोन टप्प्यांमध्ये ही रॅली होणार आहे. दहा किलोमीटरचा मार्ग लांडगे सभागृह-जय गणेश साम्राज्य-संतनगर, इंद्रायणी स्वीट्स कॉर्नर-एमआयडीसी एस ब्लॉक – लांडगे सभागृह (महिला व मुला, मुलींसाठी) असा मार्ग असणार आहे.

तर, 25 किलो मीटरचा मार्ग अंकुशराव लांडगे सभागृह – जय गणेश साम्राज्य- संतनगर- साने चौक – संतनगर – इंद्रायणी स्वीट्स कॉर्नर – एमआयडीसी एस ब्लॉक आणि लांडगे सभागृह असा असणार आहे.

सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी अशी करा नोंदणी… PCMCSmartSarathi अॅपमध्ये नोंदणी करा.
●Play store – https://bit.ly/PCMCSmartSarathiApp
●App Store – https://bit.ly/PCMCSmartSarathiIOS
किंवा पुढील लिंक वर क्लिक करून नोंदणी करता येईल.  http://bit.ly/RIVERCYCLOTHON

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.