Pimpri Corona Update : शहरात आज 555 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 251 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 251 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 555 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 7 आणि महापालिका हद्दीबाहेरील 8 अशा 15 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 210 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 53 हजार 473 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 2 हजार 529 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 828 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 701 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 91 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 650 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 948 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 24 हजार 811 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.