Pimpri School News: शहरातील 5 वी ते 8वीच्या शाळा उद्यापासून सुरु

दीड लाखांपैकी 15 हजार विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्रक सादर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 5 वी ते 8 वीच्या शाळा उद्या (गुरुवार) पासून सुरू होणार आहेत. शहरात महापालिका, खासगी अशा 647 शाळा आहेत. 1 लाख 32 हजार 438 विद्यार्थ्यांपैकी केवळ 14 हजार 62 पालकांचे विद्यार्थ्याला शाळेत पाठविण्याचे संमतीपत्रक जमा झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे.

कोरोनामुळे मागील दहा महिन्यांपासून शाळा बंद होत्या. शहरातील 5 वी ते 8 वीच्या महापालिका आणि खासगी शाळा मि‌‌ळून 647 शाळा आहेत. 3311 शिक्षक असून आतापर्यंत 2707 शिक्षकांची कोरोना तपासणी झाली आहे. यामध्ये एकाही शिक्षकाला कोरोनाची लागण झालेली नाही. अद्यापही 300 शिक्षकांची कोरोना तपासणी बाकी आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मास्क, सॉनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. शाळेत उपस्थित राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र आवश्यक असणार आहे. सकाळच्या सत्रात सकळी 8 ते 11 या वेळेत शाळा असणार आहे. तर, दुपारच्या सत्रात 1 ते 4 या कालावधीत शाळा असेल.

पाचवी ते आठवीचे शहरात 1 लाख 32 हजार 438 विद्यार्थी आहेत. 3311 शिक्षक  त्यांना शिकवतात. आता पर्यंत 14 हजार 65 पालकांनी संमतीपत्र दिले आहे. त्यामुळे अजूनही पालकांच्या मनात कोरोनाची भिती असल्याचे दिसून येत आहे.

शा‌‌ळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे तापमान मोजणे बंधनकारक आहे. महापालिकाच्या शा‌ळांना महापालिका थर्मल गन आणि ऑक्सिमीटर देणार आहे. परंतु, अद्यापही सर्व शाळांना हे साहित्य पोहचले नसल्याचे चित्र आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.