Pimpri  Corona Update :  शहरात आज 65 मृत्यू; कोरोनाबळींची संख्या 1732 

1250 जणांना डिस्चार्ज, 1151 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढतच आहे. शहरातील 36 आणि पालिका हद्दीबाहेरील पण पालिका रुग्णालयात उपचार घेत असताना 29 अशा 65 जणांचा मृत्यू झाल्याची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. आजपर्यंतची कोरोनाबळींची संख्या 1732 वर पोहोचली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना मृत्यूच्या संख्येत वाढ झाली. वाढत्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्याही आज जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1250 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहराच्या विविध भागातील 1151 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 75 हजार 267 वर पोहोचली आहे.

शहरातील 36 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 29 अशा 65 रुग्णांचा मृत्यू  झाल्याची नोंद झाली आहे. शहरातील 36 मृतरुग्णांपैकी चोवीस तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, यापूर्वी मृत्यू झालेल्या परंतु आज अहवाल प्राप्त झालेले 25 मृत्यू आहेत.

त्यात निगडी, काळेवाडी, चिंचवड, पिंपरी, दिघी, कासारवाडी, चिखली, पिंपळेगुरव, भोसरी, मोशी, आकुर्डी, सांगवी, नेहरूनगर, च-होली, रावेत, संत तुकारामनगर, जुन्नर, धायरी, चाकण, धनकवडी, वडगांवशेरी, हडपसर, आंबेगाव, देहूरोड, शिवणे, पाषाण, येरवडा, पुणे, धानोरी, बोपोडी, वाघोली, माळवाडी येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

शहरात आजपर्यंत 75  हजार 267 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 61 हजार 870 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1265 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 467 अशा 1732 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 4773 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.