Pimpri News : सामाजिक बांधिलकीचे 75 विविध समाज उपयोगी उपक्रम

एमपीसी न्यूज – मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पुर्णत्वाचा ( Pimpri News ) अमृत महोत्सव वर्षा निमित्त मराठवाडा जनविकास संघ , महाराष्ट्र राज्य यांच्या वतीन संपुर्ण मराठवाड्यात सामाजिक बांधिलकीचे 75 विविध समाज उपयोगी उपक्रम घेण्याचा संकल्प केला आहे.

 

 

त्याच अनुषंगाने भारतीय किसान संघ यांच्याशी शाश्वत कृषी उन्नतीतुन मराठवाड्याचा सर्वांगीण विकास या विषयावर चर्चासत्र पार पडले. भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख चंदन पाटील , मराठवाडा श्वाशवत कृषी विकास योजना समन्वयक शशिकांत गव्हाणे व प्रकल्प प्रमुख अनिल व्यास सुकानु योजना समिती सदस्य  यांच्याशी मराठवाड्याच्या संदर्भात मुख्य पाच विषयावर चर्चा करण्यात आली.

 

 

 

Pune News : पुण्यात गुढी पाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन

 

 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी चांगले योजना व समन्वयकातुन प्रश्न सोडविणे. मराठवाड्यातील स्थलांतर थांबविणे. महिलांकडे घरातील आर्थिक कारभार हाती देऊन समाजात महिला सक्षमीकरणाचे परिवर्तन घडविणे. मराठवाड्यात कृषी क्षेत्रा वर आधारीत प्रक्रीया उद्योगावर यशस्वी उद्योजक तयार करणे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी युवकांना कमवा व शिका योजनेतुन आर्थिक समक्ष करणे. मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार , मराठवाडा सेंद्रीय कृषी विद्यापीठ संकल्पक  दिलीप बारडकर , मराठवाडा प्रतिष्ठानचे  प्रकाश इंगोले , मराठवाडा विकास महासंघाचे अध्यक्ष भारत गोरे , गया फांऊडेशनचे अध्यक्ष डी . एस . राठोडे , उद्योजक शंकर तांबे , राष्ट्रभक्ती संस्करण फांऊडेशनचे नितीन चिलवंत,  बळीराम माळी , अमोल लोंढे , मराठवाडा विद्यार्थी आघाडी प्रमुख मारुती अवरगंड हे उपस्थित होते.

 

 

 

कार्यक्रमाची प्रस्तावना दिलीप बारडकर यांनी मांडली . भारतीय किसान संघाचे चंदन पाटील यांनी 5 वर्षांचा मराठवाडा विकासाचा आराखडा मांडला . अनिल व्यास यांनी गोसंवर्धन मराठवाडा भुमिचा विकास यावर विचार व्यक्त केले. शशिकांत गव्हाणे यांनी एकसंघ मराठवाडा गट व विकासाची भुमिका व्यक्त केली.  अरुण पवार यांनी मराठवाडा कृषी उन्नती प्रकल्प यशस्वी राबविण्यासाठी एक भव्य दिव्य स्नेह मेळावा आयोजनाची भुमिका व्यक्त केली.  नितीन चिलवंत यांनी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासा साठी कृषी विकासा सोबत छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रीक हब शेंद्रा पंचाताराकींत एम आय डी सी त व्हावे तसेच आय आय टी केंद्र सरकारचे महाविद्यालय व्हावे ही भुमिका मांडली.  सूत्रसंचालन ( Pimpri News ) बळीराम माळी यांनी केले. तर,  आभार प्रदर्शन अमोल लोंढे यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.