Pimpri News: पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार, पवना धरणात 75 टक्के पाणीसाठा

Pimpri News: 75 per cent water storage in Pavana dam जून, जुलै दोन महिने ओढ दिल्यावर ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरणातून पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणातील पाणीसाठा 74.64 टक्के झाला आहे. यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न मिटणार आहे. 1 जूनपासून 39.35 टक्क्यांनी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची भिस्त पवना धरणावर अवलंबून आहे. जून, जुलै दोन महिने ओढ दिल्यावर ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे साठ्यात वाढ होऊ लागली आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रात 26 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. 2.11 टक्क्यांनी वाढ झाली असून 1 जूनपासून 1219 मिली मीटर पाऊस धरण क्षेत्रात झाला आहे. पाणीसाठ्यात 39.35 टक्के वाढ झाली आहे.

धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे मावळ, पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

पवना धरणातील पाणी साठ्याची आजची आकडेवारी

गेल्या २४ तासात झालेला पाऊस – 26 मिमी

1 जूनपासून झालेला पाऊस – 1219मिमी

गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस – 3119 मिमी

धरणातील सध्याचा पाणीसाठा – 74.64% टक्के

गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 99.14 टक्के

गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ – 2.11 टक्के

1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ – 39.35 टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.