Pimpri News: पिंपरीतून 96 हजारांचा गुटखा जप्त

पिंपरीतील गुरूकृपा जनरल स्टोअर्स या दुकानातून गुटखा विक्री होत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरी येथे विक्रीसाठी आणलेला 96 हजार 410 रुपयांचा गुटखा जप्त केला. गुरुवारी (दि.10) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

चंदर नारायण टोकवाणी (वय 55, रा. गणपती मंदिरामागे, रिव्हर रोड, कराची चौक, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील गुरूकृपा जनरल स्टोअर्स या दुकानातून गुटखा विक्री होत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला.

यावेळी पोलिसांनी प्रतिबंधित गुटखाजन्य पदार्थ विमल पान मसाला सुपारी, गोवा गुटखा असा एकूण 96 हजार 410 रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.