Pimpri News : शहरात 98 टक्के ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण; पालिकेचा दावा

एमपीसी न्यूज – ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ च्या अनुषंगाने घेण्यात  (Pimpri News) आलेल्या आंतर झोन स्पर्धेत डिसेंबर महिन्यात प्रथम क्रमांक ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाने पटकावला. तर, द्वितीय क्रमांक ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय आणि तृतीय क्रमांक ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाने प्राप्त केला. संबंधित झोनच्या टीमचे प्रतिनिधी म्हणून झोनल अधिकारी व सहायक अधिकारी यांचा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शहरात सध्याच्या स्थितीत 98 टक्के ओला व सुका कच-याचे विलगीकरण होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 आढावा बैठक स्थायी समिती सभागृहात (Pimpri News) आयुक्त यांच्या उपस्थिती घेण्यात आली . अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त रविकिरण घोडके, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, मनोज सेठीया, रामदास तांबे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, ज्ञानदेव जुंधारे, स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक सोनम देशमुख, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांसह सर्व क्षेत्रीय अधिकारी व सहा. आरोग्य अधिकारी, आईसी सुपरवायजर, सुलभ टॉयलेट ठेकेदार, एजी/ बीव्हीजी – सुपरवायजर आदी उपस्थित होते.

Sinhagad News : चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन

बैठकीत आयुक्त यांनी स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 च्या अनुषंगाने कचरा विलगीकरण, राडारोडा उचलणे, रस्ते सफाई सार्वजनिक स्वच्छता गृहे स्वच्छता देखभाल दुरूस्ती रंगरंगोटी, नालेसफाई, जलनिस्सारण विभागानी करावयाची कामे, व्यावसायिक परिसर स्वच्छता, कचरा वाहतूक व्यवस्था सनियंत्रण साठी ICCC या कक्षात GPS द्वारे कचरा वाहतूक वाहने यांचे ट्रॅकिंग तसेच स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 च्या अनुषंगाने जनजागृती, सिटी प्रोफाइलनुसार करावयाची विविध कामे , याचा आढावा घेऊन कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

समुदाय स्वच्छतागृह देखभालीसाठी नवी दिशा उपक्रम उपयुक्त ठरत असून जास्तीत जास्त देखभालीसाठी कामे नवी दिशा अंतर्गत महिला बचत गट याकडे सोपविण्यात यावीत व स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 साठी झोननिहाय नेमलेल्या नोडल अधिकारी (Pimpri News) यांनी पुढील काळात जास्तीत जास्त क्षेत्रीय भेटी द्याव्यात अशा सूचना दिल्या. शहरात सध्याच्या स्थितीत 98 टक्के पेक्षा जास्त ओला व सुका कचरा असे विलगीकरण करून कचरा प्राप्त होत असून यात निश्चित चांगली कामगिरी दिसून येत असल्याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी समाधान व्यक्त केले. ज्या भागात कचरा विलगीकरण बाबत अडचणी असतील तेथे जनजागृती वाढवावी अशा सुचना देखील त्यांनी दिल्या.

Pimpri News : विकास कामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद – अण्णा बनसोडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.