Pimpri News: कोरोनामुळे निधन झालेल्या महापालिका कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाखाच्या मदतीचा धनादेश सुपूर्द

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे निधन झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 26 कर्मचा-यांच्या वारसांना पालिकेतर्फे प्रत्येकी 25 लाख रुपये रक्कमेचा धनादेश महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. 

यावेळी ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. 26 महापालिका मयत कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे 6 कोटी 50 लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.

कोरोना कालावधीमध्ये मयत झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांच्या दु:खामध्ये महानगरपालिका सहभागी असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.