Pimpri News : शिवजयंतीच्या नियोजनासाठी शुक्रवारी पालिकेत बैठक

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Pimpri News) साजरी करण्याबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व आयोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलीस प्रशासन, महापालिका अधिका-यांची उद्या (शुक्रवारी) समन्वय बैठक आयोजित केली आहे.

महापालिकेमधील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृहात दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रतिवर्षी 19 फेब्रुवारी रोजी एकत्रितरित्या मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. शहरातील अनेक शिवजयंती उत्सव मंडळे, विविध शैक्षणिक व इतर संस्था, ट्रस्ट, कामगार संघटना, व्यक्ती कार्यक्रमात सहभागी होतात.

Mahalunge News : माथाडी कामगारांचे आर्थिक शोषण; सात जणांवर गुन्हा

शहरात शिवजयंती साजरी करण्याबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व (Pimpri News) आयोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलिस प्रशासन, महापालिका अधिकारी आदी सर्वांची एक समन्वय बैठक उद्या होणार आहे. या बैठकीस सर्व संबंधित मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.