Pimpri News: पुणे पदवीधरचे आम आदमीचे उमेदवार डॉ. अमोल पवार यांच्याकडून मतदारांच्या भेटी-गाठी

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर मतदार संघाचे आम आदमी पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील मतदारांच्या भेटी-गाठी घेतल्या. विविध सामाजिक संघटना, महिला संघटनां तसेच पदवीधरांची संपर्क साधला आणि विविध प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली.

येत्या 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने देखील उडी घेतली आहे. डॉ अमोल पवार यांच्या रूपाने एक सुशिक्षित, अभ्यासू, सामाजिक बांधिलकी जपणारा कर्तव्यदक्ष उमेदवार देत निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. सांगली जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात डॉ. पवार यांचे उल्लेखनिय कार्य आहे.

_MPC_DIR_MPU_II

आपल्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने मागील दोन दिवस डॉ. पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील विविध भागांना भेट देत जन सामान्यांशी संपर्क साधला. बुधवारी आकुर्डी येथे आम आदमी पक्षाच्या वतीने एक चर्चासत्र आयोजित केले होते. त्यावेळी डॉ. अमोल पवार यांनी उमेदवारी मागची आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच मागील वीस वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये असलेला सहभाग आणि सामान्य माणसासाठी करत असलेल मदत कार्य याविषयी माहिती दिली.

धनंजय शिंदे, मुकुंद किर्दत तसेच आम आदमी पक्षाची अनेक वरिष्ठ मंडळी उपस्थित होती. आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांना पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांची साथ लाभली. याबद्दल युवाध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1