Pimpri News: ‘मिळकत करातून वृक्षकर रद्द करा अन् उद्यान विभाग बंद करावा’

वृक्षमित्र प्रशांत राऊळ यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील झाडांचे हाल होत आहेत.याकडे उद्यान विभागाचे लक्ष नाही. अवैध वृक्षतोड वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांच्या मिळकत करामधील वृक्ष कर रद्द करावा, तसेच उद्यान विभाग बंद करावा, अशी मागणी वृक्षमित्र प्रशांत राऊळ यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात राऊळ यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वृक्षांची देखभाल होत नाही.

_MPC_DIR_MPU_II

उद्यान विभागाच्या सहाय्याने झाडांची अवैध वृक्षतोड होत आहे. चुकीच्या पद्धतीने होणारे वृक्षारोपण, झाडांना कमी किंवा पाणी न घालणे. ट्री गार्ड रुतून झाडाला इजा होणे. झाडांना खिळे मारून जाहिराती लावणे. जाहिरात फलकासमोरील झाडे अवैधरित्या तोडणे.

झाडांना आळी न करणे. महापालिका यंत्रणा वापरून चुकीच्या पद्धतीने वृक्षतोड करणे. अजून पर्यंत एकही वृक्षतोडीवर विशेष हेतूने कारवाही न करणे. वृक्ष प्राधिकरण व हरित लवादाने दिलेल्या शिफारसीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे. अशा अनेक गोष्टींचा आम्ही वृक्षमित्र पिंपरी-चिंचवड मध्ये अनुभव घेत आहोत.

त्यामुळे मिळकत करातून वृक्षकर रद्द करावा आणि उद्यान विभाग बंद करावा. शहरातील नागरिक स्वतः वृक्षकराचे पैसे वापरून झाडे लावतील. त्याची काळजी घेतली. आम्ही त्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.