Pimpri News : ‘प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांकडून तात्पुरते रहिवासी दाखले स्वीकारा’

पिंपरी विधानसभा युवा सेनेची मागणी

एमपीसीन्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून नुकतीच प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेची सोडत काढण्यात आली. यामध्ये लाभार्थी ठरलेल्या अर्जदारांकडून आवश्यक कागदपत्र पडताळणी सुरु आहे. सध्या पंधरा वर्षांचा रहिवाशी दाखला मिळविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांकडून तात्पुरते रहिवाशी दाखले स्वीकारण्याची मागणी पिंपरी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत युवा सेनेच्यावतीने पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

प्रधानमंत्री योजनेच्या सोडतीमध्ये लाभार्थी ठरलेल्या अर्जदारांकडून रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, भाडे करार व अन्य कागदपत्र आदी कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे. रहिवासी दाखला काढण्यासाठी नागरिकांना पंधरा वर्षाचा पुरावा मागितला जात आहे.

परंतु, पंधरा वर्षाचा पुरावा नसल्यामुळे अनेक लाभार्थी नागरिकांना रहिवासी दाखला मिळत नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांकडून तात्पुरता रहिवासी दाखला घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, मोसीन शेख, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.