RTPCR Test news: कोरोना चाचणीसाठी जादा दर आकारल्यास कारवाई; महापालिकेचा खासगी प्रयोगशाळांना इशारा

एमपीसी न्यूज – भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि एनएबीएल मान्यता प्राप्त खाजगी प्रयोगशाळांना आरटीपीसीआर तपासणीचे दर ठरवून देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रयोग शाळांनी ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच दर आकारावेत. जादा दर आकारल्यास साथरोग अधिनियम 1897 नुसार संबंधित प्रयोगशाळेवर कारवाई करण्यार येईल, असे महापालिका वैद्यकीय विभागाने सांगितले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व खाजगी शाळांना वैद्यकीय विभागाने या संदर्भात पत्र पाठवून सूचना दिल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

आरटीपीसीआर तपासणीचे नमुने संकलन केंद्रावर देणात आल्यास 500 रुपये, कोविड केअर सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटर येथे नमुने दिल्यास 600 रुपये, नागरिकांच्या घरी जाऊन नुमने घेतल्यास 800 रुपये असे दर आरटीपीसीआर तपासणीसाठी ठरवून देण्यात आले आहेत.

रॅपिड अँटीजन तपासणीसाठी रुग्ण स्वतः तपासणीसाठी आल्यास 150 रुपये, तपासणी केंद्रावर नमुने घेतल्यास 200 रुपये, घरी जाऊन नमुने घेतल्यास 300 रुपये हे दर निश्चित करण्यात आले आहेत. काही खासगी प्रयोगशाळा जादा दर आकारत असल्याचे प्रकार समोर आल्याने महापालिकेने सर्व खासगी शाळांना पत्र पाठवून कारवाईचा इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.