Pimpri News: विनामास्क फिरणा-या 17 हजार लोकांवर कारवाई; 85 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्कविना फिरणा-यांवर पिंपरी पालिका आरोग्य विभागाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. मास्कविना फिरणा-या 17 हजार 115 जणांकडून तब्बल 85 लाख 57 हजार 500 रुपयांचा दंड आजपर्यंत वसूल करण्यात आला आहे.

त्यामध्ये सर्वाधिक ‘ग’ प्रभागातील 1282 नागरिकांवर तर सर्वात कमी ‘ई’ प्रभागातील 146 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय यांनी दिली.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. त्याचे नागरिकांकडून पालन केले जात नाही. त्यामुळे पालिका आरोग्य विभागाने धडक कारवाई सुरु केली आहे. पालिकेचा आरोग्य विभाग, माजी सैनिक आणि पालिका पोलिसांकडून ही कारवाई केली जात आहे. मास्क न घालणा-यांकडून 500 रुपये दंड वसूल केला जात आहे.

कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासून आजपर्यंत 17 हजार 115 मास्कविना फिरणा-या नागरिकांकडून 85 लाख 57 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे. त्यामध्ये ‘अ’ प्रभागात आरोग्य विभागाने 324 नागरिकांकडून 1 लाख 62 हजार तर माजी सैनिकांनी 214 जणांकडून एक लाख 7 हजार रुपये दंड वसूल केला आहे. ‘ब’ आरोग्य विभागाने 590 जणांकडून दोन लाख 95 हजार, माजी सैनिकांनी 18 जणांकडून 9 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ‘क’ प्रभागातील आरोग्य विभागाने 495 जणांकडून दोन लाख 47 हजार 500 रुपये तर माजी सैनिकांनी 169 जणांकडून 84 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे.

‘ड’ आरोग्य विभागाने 761 जणांकडून तीन लाख 80 हजार 500 रुपये, माजी सैनिकांनी 364 जणांकडून एक लाख 82 हजार, ‘ई’ आरोग्य विभागाने 146 जणांकडून 73 हजार रुपये, माजी सैनिकांनी 95 लोकांकडून 47 हजार 500 रुपये, ‘फ’ आरोग्य विभागाने 532 जणांकडून दोन लाख 66 हजार, माजी सैनिकांनी 323 जणांकडून एक लाख 61 हजार 500 रुपये, ‘ग’ आरोग्य विभागाने 1282 लोकांकडून सहा लाख 41 हजार रुपये, माजी सैनिकांनी 155 लोकांकडून 77 हजार 500 रुपये, ‘ह’ आरोग्य विभागाने 398 नागरिकांकडून एक लाख 99 हजार रुपये आणि माजी सैनिकांनी 40 जणांकडून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, पालिकेच्या पोलिसांनी 11 हजार 209 नागरिकांकडून 56 लाख 4 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

लस येईपर्यंत मास्क हाच रामबाण उपाय आहे. मास्कमुळे कोरोनापासून आपण बचाव करु शकतो. त्यामुळे नागरिकांनी मास्क परिधान करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वांनी मास्क परिधान करावेत, असे आवाहन डॉ. रॉय यांनी केले. तसेच मास्कविना फिरणा-यांवरील कारवाई यापुढे देखील सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.