Pimpri News :धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह करणाऱ्या तब्बल 48 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर ( Pimpri News ) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह करणाऱ्यांच्या  विरोधात 7 मार्च रोजी विशेष मोहिम राबविली. यामध्ये केवळ 48 जणांवर कारवाई केली आहे. त्यामुळे नागरिक सुधारले की काय ,अशी शंका उपस्थित झाली आहे.

ब्रिदींग अनॅलायदजर तपासणी कोरोनापासून बंद करण्यात आली आहे. सध्या रक्त तपासणी केली जाते त्यानुसार तपासणी करण्यासाठी बराच कालावधी जातो. त्यामुळे पोलिसांचीही मोठी तारांबळ उडत आहे. त्याचा परिणाम म्हणून कालच्या विशेष मोहिमेत केवळ 48 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दोषी नागरिकांवर न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे.

Maharashtra News : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान

हि मोहीम पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक ( Pimpri News ) शाखेमार्फत राबविण्यात आली आहे. ही कारवाई पुढेही अशीच सुरु राहणार असल्याचे पोलीस सहाय्यक आयुक्त सतीश माने यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.