Pimpri News : ऑटोरिक्षा मीटर पुनःप्रमाणीकरण न केलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज –  प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे,  पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार 1 सप्टेंबर 2022 पासून भाडेवाढ लागू केलेली आहे. ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण करण्याकरीता मुदतवाढ (Pimpri News) देऊनही पुन:प्रमाणीकरण न करणाऱ्या ऑटोरिक्षा चालक, मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

ऑटोरिक्षा धारकांनी त्यांच्या ऑटोरिक्षा भाडेमीटरचे पुनःप्रमाणीकरण व मीटर तपासणीचे काम विहीत मुदतीत न केल्याने तसेच ऑटोरिक्षा संघटनांकडून ऑटोरिक्षा परवानाधारक, पालकांची गैरसोय टाळण्यासाठी मीटर पुनःप्रमाणीकरणाकरीता मुदतवाढ मिळण्याबाबत केलेल्या मागणीचा विचार करता मीटर पुनःप्रमाणीकरण करण्यास सुरुवातीस 1 ते 30 नोव्हेंबर आणि नंतर 1 डिसेंबर 2022 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, प्राधिकरणाने घेतला होता.

Budget 2023 Live Updates : भारतीय रेल्वेसाठी 2.40 लाख रुपयांची तरतूद; वाचा सविस्तर

 

मुदतीत मीटर कॅलीब्रेशन करून न घेणाऱ्या ऑटोरिक्षाधारकांवर परवाना निलंबन किंवा तडजोड शुल्काची कारवाई करण्यात येणार आहे.  मीटर कॅलीब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतर विलंबासाठी किमान 7 दिवस व त्यापेक्षा अधिक प्रत्येक एक दिवसासाठी 1 दिवस आणि एकूण कमाल निलंबन कालावधी 40 दिवस राहणार आहे.

निलंबनाऐवजी तडजोड शुल्काचा विकल्प घेतल्यास मुदत समाप्तीनंतरच्या (Pimpri News) प्रत्येक दिवसासाठी 50 रूपये मात्र किमान 500 रूपये आणि कमाल तडजोड शुल्क 2 हजार रूपयांपर्यंत असेल. मीटर तपासणीचे काम फुले नगर व आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे सुरूच राहील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.