Pimpri News : विना मास्क कारवाई थंडावली, चार दिवसात 17 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाचे संकट कायम असून घराबाहेर पडल्यावर मास्क परिधान बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क परिधान न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मास्क कारवाई थंडावल्याचे दिसून येत आहे. मागील चार दिवसात केवळ 17 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार, 22 ते 25 सप्टेंबर या चार दिवसात शहराच्या विविध भागात 17 जणांवर मास्क न घातल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बुधवारी (दि.22) 5 जणांवर, 23 – 8, 24 आकडेवारी उपलब्ध नाही, 25 सप्टेंबरला 4 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका कायम असून मास्क परिधान करणे बंधनकारक आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तरीही नागरिकांमध्ये बेफिकीरी वाढली आहे. ठिकठिकाणी होणार-या गर्दीत नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा विसर पडल्याचे दिसून येते. कोरोना संकटाचा धोका अद्याप कायम आहे, त्यामुळे नागरिकांनी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अजूनही गरजेचे असल्याचे आरोग्य तज्ञ सांगतात.

दरम्यान, महाराष्ट्रात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, 7 ऑक्टोबरपासून सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे आणि 22 ऑक्टोबरपासून सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.