Pimpri News : मनसे चित्रपट कर्मचारी सेनेकडून रंगभूमी दिनानिमित्त अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – जागतिक रंगभूमी दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा सन्मान करण्यात आला. शनिवारी (दि. 27) रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा सन्मान करण्यात आला आहे.

यावेळी निर्माते अमर गवळी, मनसे चित्रपट सेना शहर संघटक प्रज्ञा पाटील, शहर संघटक दत्त घुले, शहर उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, सचिव शिवनाथ दिलपाक, उपाध्यक्ष दीपक भालेराव, प्रसाद खैरे, रोहन पवार, वैजिनाथ डोपरे, सुरज राक्षे, स्वप्नील सरकार आदी उपस्थित होते.

जागतिक रंगभूमी दिन शनिवारी (दि. 27) पार पडला. रंगभूमीसाठी वाहून घेतलेल्या कलाकारांनी हा दिवस कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आपापल्या परीने साजरा केला. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे सध्या ‘धनंजय माने इथंच राहतात’ हे नाटक सुरु असून त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रिया बेर्डे यांनी आजवर अनेक वर्ष रंगभूमीवर अभिनय केला आहे. त्यांच्या रंगभूमीच्या योगदानाबद्दल मनसे चित्रपट कर्मचारी सेनेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.