Pimpri News: महापालिका सेवेतून अतिरिक्त आयुक्त अजित पवार तडकाफडकी कार्यमुक्त

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत रुजू झाल्यापासून विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना आज (बुधवारी) तडकाफडकी महापालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले. आयुक्त राजेश पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कोविड केअर सेंटरला दिलेल्या जादा बिलांमुळे पवार अडचणीत आले होते. त्यांचे सर्व आर्थिक अधिकारही काढून घेण्यात आले होते.

राज्याच्या महसुल विभागातील अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अजित पवार यांची मूळ नियुक्ती पुण्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी आहे.

_MPC_DIR_MPU_II

तथापि, त्यांची 24 जुलै 2019 रोजी पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्यात आली होती. ही नेमणूक दोन वर्षे कालावधीसाठी होती. 5 सप्टेंबर 2019 रोजी ते महापालिकेत रूजू झाले होते.

19 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी विविध निर्णय घेतले.कोरोना महामारीत फिल्डवर्क करत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. परंतु, कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नसताना कोटी रुपयांची बिले अदा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

तसेच त्यांच्या कार्यशैलीवर आणि नेमणुकीवर विविध आक्षेप घेण्यात आले. या पार्श्वभुमीवर आयुक्त राजेश पाटील यांनी पवार यांना महापालिका सेवेतून आज तडकाफडकी कार्यमुक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment