Pimpri News : भारतीय जनता युवा मोर्चा शहर सचिवपदी आदित्य कुलकर्णी 

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराची कार्यकारिणी शुक्रवारी (दि.25) रोजी जाहीर करण्यात आली. आदित्य कुलकर्णी यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी महापौर माई ढोरे, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, उज्वला गावडे, अनुप मोरे, वैशाली खाडे, राजू लांडगे, योगेश चिंचवडे, विनोद तापकीर, आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे यांनी आदित्य कुलकर्णी यांना निवडीबद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.