Pimpri News: जनगणनेसाठी 30 जूनपर्यंत प्रशासकीय सीमा गोठविण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – देशात 2021 मध्ये नियोजित असलेल्या जनगणनेची तारीख पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली (Pimpri News) आहे. रजिस्ट्रार आणि जनगणना कार्यालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून जनगणनेसाठी प्रशासकीय सीमा गोठविण्याचे काम 30 जून 2023 पर्यंत पूर्ण करण्यास कळवले आहे. यानंतर तीन महिन्यांनी जनगणना सुरु केली जाऊ शकते. त्यामुळे जनगणनेची प्रक्रिया 2024 च्या आधी पूर्ण होणे कठीण दिसते.

दर दहा वर्षांनी जनगणना होते. पहिली जनगणना 1881 साली झाली. नंतर दर 10-10 वर्षांनी जनगणना झाली. त्यामुळे दर 10 वर्षांची तुलनात्मक माहिती विश्लेषणासह उपलब्ध आहे. 2021 मात्र ती पार न पडल्याने पहिल्यांदा खंड पडला आहे. या आधारे मागील वर्षांचे नेमके मूल्यमापन करणे, वर्तमानातील योजना अचूकपणे आखणे व भविष्याबाबत ठोकताळे बांधणे शक्य होते. ते आता जमणार नाही. कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी, योजनांच्या अंमलबाजवणीसाठी कालबद्ध पद्धतीने जनगणना गरजेची आहे.

2011 नंतर 2021 मध्ये जनगणना (Pimpri News)जाहीर होणे अपेक्षित होते. नियमित शिरस्त्यानुसार घरांचे लिस्टिंग, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदी अद्ययावत करण्याचे काम 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 दरम्यान होणे अपेक्षित होते. परंतु , कोरोना महामारीच्या लाटेत जनगणना अडकली. केंद्र सरकारच्या महारजिस्ट्रार कार्यालयाने जिल्हा, तालुका, शहर, गावांच्या प्रशासकीय सीमेत 30 जूनपर्यंत बदल न करण्याचे आदेश दिले होते. परंतु, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे ती करता आली नाही.

केंद्र सरकारने या सीमा 31 डिसेंबरपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. आता पुन्हा त्यात वाढ करुन केंद्राच्या महारजिस्ट्रार कार्यालयाने 30 जून 2023 पर्यंत जिल्हा, तालुका, शहर, गावांच्या प्रशासकीय सीमा कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जनगणनेचे काम लवकरच सुरू होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Mumbai : सुप्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.