Pimpri News : ॲड. जया उभे यांना मानद डॉक्टरेट पदवी

एमपीसीन्यूज : खराळवाडी-पिंपरी येथील ॲड. जया बाळकृष्ण उभे यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत महात्मा गांधी वर्चुअल यूनिवर्सिटी फ़ॉर पीस यांच्यावतीने मानद डॉक्टरेट ( होनोररी डॉक्टरेट ) पदवी देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

मुंबई येथील ललित के फोरमच्या सभागृहात नुकताच हा कार्यक्रम पार पडला. प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. संदीप सिंह, अक्षरमंच प्रकाशकचे डॉ. योगेश जोशी, प्रा. डॉ. दिनेश गुप्ता व डॉ. अनिता गुप्ता यांच्यावतीने या पदवीचे वितरण करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, कोरोना संकटामुळे ॲड. उभे या कार्यक्रम उपस्थित राहू शकल्या नाही. त्यामुळे त्यांना कुरिअरद्वारे ही पदवी देण्यात आली.

दरम्यान, ॲड. उभे यांनी खडतर परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. आतापर्यंत त्यांनी ५२ शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करुन दोन विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदविले आहेत. त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत असंख्य संस्था आणि संघटनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.