Pimpri News: ‘कोरोना सोबत जगताना’ छायाचित्रण स्पर्धेत खुल्या गटात अजय जयस्वाल, महिला गटामध्ये सतेजा राजवाडे प्रथम

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली होती. : Ajay Jaiswal in open group, Sateja Rajwade first in women's group in 'Living with Corona' photography competition

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ‘कोरोना सोबत जगताना’ या छायाचित्रण स्पर्धेमध्ये खुला गटामध्ये अजय जयस्वाल तर महिला गटामध्ये सतेजा राजवाडे यांना प्रथम क्रमांक मिळाला.

महापालिकेने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त 10 ते 17 ऑगस्ट 2020 दरम्यान छायाचित्रण स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड, पुणे शहरांसह सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आदी शहरांतून 550 हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.

या स्पर्धेसाठी कोरोना सोबत जगताना या विषयाला अधोरेखित करणा-या 354 छायाचित्रांमधून खुला गट व महिला गटात प्रत्येकी 5 विजेते निवडण्यात आले.

खुला गटातून प्रथमेश नौगण यांना द्वितीय, महिंद्र कोल्हे यांना तृतीय, प्रदिप कोलेकर व अभय बलकवडे यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला आहे.

तर, महिला गटामध्ये सुखदा तांबे यांना द्वितीय, ऐश्वर्या सराफ यांना तृतीय, सुरेखा भोसले व अनुजा गुजर यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला आहे.

या स्पर्धेसाठी प्रसिद्ध फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर व महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, आर्टिस्ट कम छायाचित्रकार विलास साळवी यांनी परिक्षक म्हणून काम पहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.