-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri News: ‘शिवसेनेचा महापौर करणार’ संजय राऊत यांच्या या विधानावर अजित पवार म्हणाले…

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे शहरातील दौरे वाढले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला जात आहे. चार्ज केले जात आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला महापालिकेत मागील साडेचार वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. ही सत्ता हिसकावून घेण्यासाठी राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी 9 जुलै रोजी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसवायचा या जिद्दीने शिवसैनिक कामाला लागलेत. आगामी निवडणुकीत 50 नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट असून त्याद्वारे शहराचा महापौर शिवसेनेचाच करण्याचा निर्धार त्यांनी केला.

याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले, ”कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते शहरात आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना स्फुरण चढावे. ईर्ष्या निर्माण व्हावी. कार्यकर्ते कामाला लागावेत. यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करणारच, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस सगळीचे अशी वक्तव्ये करणार, आणखीन कोणती आघाडी असेल. तर, तेही करणार, प्रत्येकजण आपल्या-आपल्या परीने बोलतात. आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काय वक्तव्ये करायचे हा त्यांचा अधिकार आहे”.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn