Pune Metro news: अजितदादांना पुणे  मेट्रोचे पहिले तिकीट;  संत तुकारामनगर ते खराळवाडीपर्यंत केला प्रवास

पहाटे पाच वाजता घेतला मेट्रोच्या कामाचा आढावा

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी)  पहाटे पाच वाजता पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा पाहाणी दौरा केला. संत तुकारामनगर येथील मेट्रो स्थानकातून  कामाचा सविस्तर आढावा घेतला. पुणे मेट्रोचे पहिले तिकीट उपमुख्यमंत्री पवार यांना देण्यात आले.  त्यानंतर त्यांनी संत तुकारामनगर ते खराळवाडीपर्यंत  प्रवास केला.  मेट्रो मुख्याधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासह मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

 पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील पीसीएमसी ते रेंज हिल या मार्गावरील काम वेगात सुरू आहे. काम अंतिम टप्प्यात आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे अचानक मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. त्यांनतर कामाची प्रत्यक्षात पाहणी केली. पवार यांनी मेट्रोचे मुख्याधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्याकडून मेट्रोबद्दल सविस्तर माहिती घेतली.

 

त्यांनतर अजितदादांना मेट्रोचे पहिले तिकीट देण्यात आले. त्यांनी संत तुकारामनगर ते खराळवाडीपर्यंत  प्रवास केला. प्रवास करत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना काही कामाबाबत सूचना देखील दिल्या. यावेळी केवळ मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

राज्य सरकार कडून जी मदत लागेल ती देण्याचा प्रयत्न केला जाईल. मी अर्थमंत्री म्हणून राज्य सरकारचा हिस्सा वेळोवेळी देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, अजित पवार यांच्या या धावत्या पाहणी दौ-याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणतीच माहिती नव्हती. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यापैकी कोणीही उपस्थित नव्हते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.