Pimpri News: शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सर्व केंद्रे बुधवारी बंद

एमपीसी न्यूज – लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे उद्या (बुधवारी) बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरोग अधिनियम 1988 अन्वये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. कोविड 19 या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे 16 जानेवारी 2021 पासून आरोग्य कर्मचारी (HCW), 2 फेब्रुवारी पासून आघाडीचे कर्मचारी (FLW), 1 मार्च पासून 60 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण तसेच 1 एप्रिल 2021 पासून 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आणि 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.

शासन मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचे कोविड 19 लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. उद्या (बुधवारी) लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत, अशी माहिती सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.